चीनच्या धोरणामुळे भारतात वैद्यकीय उपकरणं महाग
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2022
- 746
मुंबईः पेट्रोलियमनंतर आता आरोग्यसेवेचा खर्च वाढला आहे. दुबळा रुपया, चीनमधली टाळेबंदी आणि तिथल्या सरकारच्या काही धोरणांमुळे आयात वैद्यकीय उपकरणं आणि काही औषधांच्या किमती गेल्या एका वर्षात 12 ते 55 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
या वर्षात आतापर्यंत रुपयाचं सुमारे 7.5 टक्के अवमूल्यन झालं आहे. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांची आयातही जवळपास तितकीच महाग झाली आहे. याव्यतिरिक्त, औषधांचा मुख्य कच्चा माल असलेल्या एपीआयची किंमत 120 टक्क्यांनी वाढली आहे. या सर्वांमध्ये, सरकारने पाच हजार रुपयांपेक्षा जास्त भाडं असलेल्या नॉन-आयसीयू रुग्णालयाच्या खोल्यांवर पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. लोकल सर्कल्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 52 टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांच्या वैद्यकीय खर्चात झपाट्याने वाढ झाली आहे. सर्जिकल उपकरणं आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या किमती 18 टक्क्यांपर्यंत वाढल्या. असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीनुसार, 2021-22 मध्ये 63 हजार दोनशे कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणं आयात करण्यात आली. 2020-21 मधल्या 44 हजार 708 कोटी रुपयांच्या आयातीपेक्षा हे प्रमाण 41 टक्के जास्त आहे.
रुपयाच्या घसरणीमुळे शस्त्रक्रिया उपकरणं, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांची किंमत 10-18 टक्के जास्त आहे. एपीआयसारख्या औषधांचा कच्चा माल 200 टक्क्यांनी महागला. केअर एज या रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार, चीनमध्ये कोविडच्या मर्यादांमुळे एपीआयच्या किमती गेल्या 12-18 महिन्यांमध्ये 25-120 टक्के वाढल्या आहेत. जिलेटिन, सेल्युलोज, स्टार्च, सुक्रोज आणि पॉलीथिलीन ग्लायकोल यासारखे एक्सपिएंट्स दोनशे टक्के महाग झाले आहेत. ते औषधी उत्पादनात डोस स्वरूपात वापरले जातात. अँटिबायोटिक्स आणि पेनकिलरच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने या वर्षी फार्मा कंपन्यांना देशी फॉर्म्युलेशनच्या किंमती म्हणजे स्वदेशी विकसित औषधांच्या किमती दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली होती. यामुळे वेदनाशामक आणि प्रतिजैविकांसह हृदयरोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या सुमारे आठशे औषधांच्या किमतीत किमान दहा टक्के वाढ झाली आहे. काही औषधांच्या किमती 55 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. कारण त्यांच्या उत्पादनामध्ये पीआयसारख्या अधिक आयात केलेला कच्चा माल वापरला जातो.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai