पीएम आवास योजनेला मुदतवाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 12, 2022
- 688
शहरी भागातही मिळणार 31 मार्च 2024 पर्यंत लाभ
नवी दिल्ली : मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेला (शहरी) दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. आता या योजनेचा लाभ 2024 पर्यंत मिळू शकणार आहे. या योजनेअंतर्गत सध्या एकूण 122 लाख घरांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी 65 लाख घरे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर, उर्वरित घरांचे बांधकामही पूर्ण केले जाणार आहे.
सर्वांना 2022 पर्यंत घर मिळावे म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना 2015 साली जाहीर केली होती. या योजने अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील जनतेला 6.5% दराने कर्ज देण्याचे बंधन बँकांना घातले होते. शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील ही योजना मार्च 2022 ला संपुष्टात आली होती. यातील ग्रामीण योजनेला मे 2022 मध्येच 2024 पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र शहरी योजनेबाबतचा निर्णय घेण्यात आला नव्हता. परंतु आता शहरी योजनेलाही 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील गरीब आणि दुर्बल आर्थिक घटकातील लोकांना स्वतःचं घर देते. या योजनेच्या माध्यमातून ज्यांना स्वतःचं घर नाही अशा लोकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे, विधवा, अनुसूचित जाती-जमाती लोकांनाही या योजनेचा लाभ मिळतो. या घरांमध्ये पाण्याचे कनेक्शन, शौचालये आणि वीज इत्यादी अनेक मूलभूत सुविधा मिळतात.
- उत्पन्नाचे तीन टप्प्यात वर्गीकरण
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने 3 उत्पन्न स्लॅब तयार केले आहेत. पहिली कॅटगरी म्हणजे, ज्या लोकांचे उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे, तर दुसरी कॅटगरी म्हणजे ज्यांचे उत्पन्न 3 ते 6 लाखांच्या दरम्यान आहे. तसेच, तिसरी कॅटगरी म्हणजे ज्या लोकांचे उत्पन्न 6 ते 12 लाखांच्या दरम्यान आहे. यामध्ये सरकार तीन हप्त्यांमध्ये पैसे देते. पहिला हप्ता 50 हजार रुपये, दुसरा हप्ता 1.50 लाख रुपये आणि तिसरा हप्ता 2.50 लाख रुपये आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai