शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2022
- 793
मुंबई : शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर नवीन चिन्हासाठी शिंदे गटाने दिलेले पर्याय निवडणुक आयोगाने नाकारले होते. काल ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने दिलेल्या पर्यायांमधून निवडणूक आयोगाकडून त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आले आहे.
निडणूक आयोगाने काल दोन्ही गटांना पक्षाची नावं दिली. यात ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आलंय. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव दिलं होतं. शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला दुसर्या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून आज ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशी तीन चिन्हं देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि त्यामध्ये ढाल आहे. तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटाने पहिल्या पसंतीस दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाने हे चिन्ह शिंदे गटाला नाकारलं आहे. कारण उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो. कारण उगवता सूर्य हे पहिल्यापासूनच डीएमके पक्षाचं चिन्ह आहे. याबरोबरच मिझोराम नॅशनल पक्षाचं देखील उगवता सूर्य हे चिन्ह आहे. त्यामुळे शिंदे गटाला उगवता सूर्य हे चिन्ह नाकारण्यात आले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai