नवी मुंबईत बोकाव्हायरस
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 11, 2022
- 488
दोन वर्षांच्या मुलावर मेडिकव्हर रुग्णालयात यशस्वी उपचार
नवी मुंबई : कोरोना संसर्ग कमी झाला असतानाच आता बोकाव्हायरस डोके वर काढू पाहत आहे. बोकाव्हायरस संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या दोन वर्षाच्या बाळावर नवी मुंबई येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे सल्लागार आणि बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सावंत आणि त्यांच्या टीमने यशस्वी उपचार केले.
एका दोन वर्षाच्या चिमुरड्याला आपत्कालीन स्थितीत मेडिकव्हर हॉस्पिटलमधील बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याला श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता (88% ऑक्सिजन सॅच्युरेशन). त्याला आठवडाभरापासून सर्दी आणि खोकला देखील होता. रुग्णालयात दोखल होताच मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे सल्लागार आणि बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब हाय-फ्लो ऑक्सिजन, स्टिरॉइड्स, नेब्युलायझेशन आणि लक्षणात्मक उपचार सुरू केले. बाळाचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, जे बोकाव्हायरस संसर्गासाठी पॉझिटिव्ह आढळले. या चिमुरड्याला टाईप 1 विषाणूची बाधा झाली होती.
मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील नवजात बालकांच्या आजारावरील तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, म्हणाले, बोकाव्हायरसचे निदान नाकातील, शौचाचे आणि रक्ताच्या नमुन्यांच्या पीसीआर चाचणीद्वारे केले जाऊ शकते. ही चाचणी खूप महाग असल्याने, ही चाचणी नियमितपणे करत नाही. तीव्र स्वरुपाच्या श्वसनाचा त्रास असलेल्या मुलांमध्येच शक्यतो ही चाचणी केली जाते. या विषाणूचा प्रादुर्भावाचे प्रमाण 1.5 टकक्यापासून ते 19.3 टक्क्यांपर्यत आहे. हा विषाणू वर्षभर आढळतो. परंतु प्रामुख्याने हिवाळ्यात आणि हिवाळा आणि उन्हाळ्याच्या मधल्या काही दिवसांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या बालरोग अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. नरजॉन मेश्राम सांगतात की, बोकाव्हायरसचा पहिला रुग्ण 2005 मध्ये आढळला होता. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत आम्हाला बोकाव्हायरस संसर्गाचे काही रुग्ण दिसून येत आहेत. हा एक दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग असला तरी, वेळेत निदान न केल्यास तर प्रकृती गंभीर होऊन मृत्यूचाही धोका असतो. बोकाव्हायरस संसर्गावर कोणतेही विशिष्ट औषध किंवा उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णाला लक्षणात्मक आणि सहायक उपचार दिले जातात.
बोकाव्हायरसमध्ये टाइप 1, टाइप 2 आणि टाइप 4 सारखे अनेक प्रकार आहेत. टाइप 1 विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. टाइप 2 आणि 4 अतिसार, ओटीपोटात दुखणे इत्यादी लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी म्हणजेच पोटाच्या विकाराशी संबंधित संसर्ग आहे. हा विषाणू प्रामुख्याने तीन वर्षांखालील मुलांना संक्रमित करतो. या विषाणूची लक्षणे इतर इन्फ्लूएंझा विषाणूंसारखीच आहेत (खोकला, सर्दी आणि श्वसनमार्गाचे संक्रमण). त्यामुळे हा व्हायरस लवकर ओळखणे आव्हानात्मक ठरते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai