मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील 42 दुचाकी जळून खाक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2022
- 442
नवी मुंबई ः मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर पार्कींग करण्यात आलेल्या दुचाकींना आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पार्कींगमधील तब्बल 42 दुचाकी भक्ष्यस्थानी पडल्या. आग नेमकी कशी लागली त्याचे कारण अद्याप समजले नाही. नेमकी ही आग कोणी लावली की लागली याबाबत पोलीस व अग्नीशमन यंत्रणेचे अधिकारी तपास करीत आहेत.
मानसरोवर स्थानकालगत सिडकोच्या गृहप्रकल्पांचे काम सुरु असल्याने तेथील सिडकोचे वाहनतळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर तसेच उर्वरित जागेत दुचाकी पार्क केल्या जातात. सोमवारी संध्याकाळी येथील दुचाकींना अचानक आग लागली. बघता बघता सर्व दुचाकींनी पेट घेतला व जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच सिडको महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होवून आग आटोक्यात आणली. त्यामुळे 10 वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचली. रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरु असून यामुळे आग कशी लागली किंवा कोणी लावली याचा छडा लागणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai