तळीरामांचा अर्थव्यवस्थेला आधार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 07, 2023
- 617
मुंबई ः कोरोनाचे संकट दूर गेल्यानंतर राज्यासह देशाचा आर्थिक गाडा पुन्हा सुरू झाला. कोरोनाकाळात अर्थव्यवस्थेचे चाक टाळेबंदीत रुतल्याने सरकारसमोर महसुलाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता, कोरोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मद्य विक्रीतून सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात मद्य विक्रीतून मिळणार्या महसुलात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातल्या नऊ महिन्यांमध्ये 14 हजार 480 कोटींचा महसूल मिळाला आहे.
- आठ महिन्यात 25 कोटी लिटर मद्य विक्रि
कोरोनाकाळात राज्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यात मद्यविक्रीलादेखील फटका बसला. कोरोना निर्बंध शिथील केल्यानंतर काही प्रमाणात मद्य विक्री सुरू झाली होती; मात्र आता कोरोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्यामुळे मद्यविक्रीदेखील जोमाने वाढली असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत 34.5 कोटी लिटर देशी मद्याची विक्री नोंदवण्यात आली, तर 2022 मध्ये याच काळात राज्यात 25 कोटी लिटर मद्य विकले गेले. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 23.5 कोटी लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. 2021-22 या आर्थिक वर्षात याच काळात 17.5 कोटी लिटर विदेशी मद्य विकले गेले. - बिअर विक्रत घट
कोरोना महासाथीच्या काळात बिअरची विक्री मोठ्या प्रमाणात घटली होती. अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होत असताना बिअरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या महिन्याच्या कालावधीत 23 कोटी लिटर बिअरची विक्री झाल्याची नोंद आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात 21 कोटी लिटर बिअरची विक्री झाली होती. उच्चभ्रू वर्गाची पसंती असणार्या वाइनची मागणीही वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यात 88 लाख लिटर वाइनची विक्री झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात 66 लाख लिटर वाइन विकली गेली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात वाइन विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. - 14 हजार 480 कोटी रुपयांचा महसूल
2021-22 या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील मद्यविक्रीतून 17 हजार 117 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या केवळ आठ-नऊ महिन्यांच्या कालावधीत 14 हजार 480 कोटी रुपयांची तिजोरीत भर पडली आहे. यंदा मद्यविक्रीतून 22 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, अशी अपेक्षा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai