विक्रांत जहाजाच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2023
- 572
12 ते 20 जानेवारीपर्यंत मंत्रालयात आयोजित
पनवेल ः नौदलाचा बाहुबली, देशाची ताकद वाढणारा आणि शत्रूला धडकी भरणाऱ्या आयएनएस विक्रांत जहाजाची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी आयएनएस विक्रांत या जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार आहे. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
संस्कार भारती (कोकण प्रांत) व ओरायन मॉल पनवेल आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृती प्रदर्शन मुंबई येथे 12 ते 20 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पंचरत्न हॉटेल येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, पनवेलच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या गोष्टीबद्दल आपल्या सर्वाना अभिमान आहे. त्याचप्रमाणे एक अभिमानाची बाब म्हणून आयएनएस विक्रांत जहाजाची प्रतिकृती दृष्टीक्षेपात आली आहे. कोविडच्या दुःख काळानंतर विविध सण साजरे करायला सुरुवात झाली. त्यामध्ये सर्वात मोठा सण दिवाळी साजरा होत असताना संस्कार भारती व ओरायन मॉलच्यावतीने आयएनएस विक्रांत प्रतिकृती लोकांच्या हृदयात सामवण्यासाठी प्रदर्शनाच्या रुपात मांडण्यात आली. त्याला पनवेलकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंत्रालयात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकं येत असतात आणि वर्षभर त्या ठिकाणी वर्दळ असते, त्या अनुषंगाने हि माहिती फक्त पनवेल पुरती मर्यादित न ठेवता त्याची महाराष्ट्रभर माहिती व्हावी, त्याकरिता महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेल्या मंत्रालयात हे प्रदर्शन भरविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्कार भारतीचे महामंत्री अँड. अमित चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले कि, आयएनएस विक्रांत हे आताचे जहाज भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणारी आहे. देशाची पहिली स्वदेशी आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. याची माहिती सर्वांना पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला. या जहाजाची प्रतिकृती संस्कार भारतीच्या चित्रविद्या विभागाचे प्रमुख सिद्धार्थ साठे यांनी अवघ्या 12 दिवसात भव्य स्वरूपात आणि बारकाईने सर्व बाबी समाविष्ट करून साकारली असून या प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai