शून्य अपघाती मृत्यू हेच ध्येय
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 13, 2023
- 534
रस्ता सुरक्षा सप्ताहात वाहतुक सुरक्षेविषयी व्यापक जनजागृती
नवी मुंबई ः वाहतूक शाखेतर्फे रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान होणार आहे. या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, व्हॉईसओवर आर्टीस्ट मेघना एरंडे यांचे उपस्थितीत होते. यावेळी जनजागृतीमधील छोटा पोलीस सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शुन्य अपघात आणि शुन्य अपघाती मृत्यू हे ध्येय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
देशात दरवर्षी दीड लाख लोकांचा जीव अपघातात जातो. नवी मुंबईतही दरवर्षी किमान 250 लोकांचा जीव जातो तर 150 पेक्षा अधिक लोक कायम जायबंदी होतात. त्यामुळे दरवर्षी जानेवारीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. कोरोना काळानंतर 2022 मध्ये संसर्गजन्य नियमपालन करीत हा सुरक्षा सप्ताह पार पडला मात्र यंदा जोशात होणार असल्याचे सुतोवाच वाहतूक शाखेकडून केले गेले आहे. या सप्ताहाचे उद्धाटन सिडको एक्झीबीशन सेंटर, वाशी येथे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, प्रमुख अतिथी व्हॉईसओवर आर्टीस्ट मेघना एरंडे यांच्या हस्ते पार पडले. तर सप्ताहाचा समारोप 17 जानेवारीला करण्यात येणार आहे.
संपुर्ण सप्ताह मध्ये नागरिकांमध्ये वाहतुक सुरक्षे विषयी व्यापक जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टीने दररोज वाहतुक नियमांच्या वेगवेगळया विषयांवर वेगवेगळे उपक्रम नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे विविध चौकात राबविण्यात येणार आहेत. यात हेल्मेट डे, सीट बेल्ट डे, नो सिग्नल जंम्पींग डे, नो हॉकींग डे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर न करणे, वन डे विथ ट्रॅफिक पोलीस, जड अवजड वाहने डावे बाजूने चालविणे (किप लेप्ट), नो फॅन्सी नंबर प्लेट, नो टिटेंड ग्लास इ. विषयांवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे महत्वाचे चौकांत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक भागातील आमचे अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत या साठी अन्य प्राधिकरण जसे सिडको मनपा एमआयडीसी चीही मदत घेतली जाणार आहे. या वेळी अभिनेत्री आणि व्हाईस ओव्हर कलाकार मेघना एरंडे यांनी कार्टून मधील लोकप्रिय कॅरेक्टरच्या आवाजात वाहतुकीच्या नियमांचा माहिती दिली. मनोरंजनासोबत या माहितीने सर्वांची मने जिंकली.
या कार्यक्रमात वाहतूक पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी माहिती देताना सांगितले की सप्ताह निमित्त दोन हजार हेल्मेटचे वाटप होणार असून त्यात लहान मुलांची 500 हेल्मेट आहेत. शून्य अपघात आणि त्यामुळे शून्य अपघाती मृत्यू हेच ध्येय असणार आहे. यावेळी सर्व विभागाचे पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, तसेच सर्व वाहतूक पोलीस बिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. बेशिस्त रिक्षा चालकांच्या मुळे वाहतूक विस्कळीत होणे, वाहतूक कोंडी होणे, छोटे मोठे अपघात ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे रिक्षा चालकांची जनजागृती विशेष करण्यात येणार आहे. जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती आयुक्त भांबरे यांनी दिली.
सदर उपक्रमांमध्ये प्रामुख्याने
- पोलीस वाहन चालकांना नियम समजावून सांगून प्रबोधन करण्यावर भर देणार
- छोटा पोलीस, यमराज, दारुची बाटली, इत्यादींचे मॅस्कॉटचा उपयोग
- फ्लॅश मॉब व पथनाटय यांचे सादरीकरण
- वाहतुक सुरक्षेविषयी संदेश देणारे स्टिकर्स चौकाचौकात चिकटविणार
- नागरिकांना माहितीपत्रके वाटप
- मोफत हेल्मेट वाटप, पीयुसी चेकींग कॅम्प, वाहनांना रिफ्लेक्टर लावणे
- वाहनचालक व वाहतुक पोलीस यांचेसाठी डोळे तपासणीचा कॅम्प
- आयुक्तालय स्तरावर रक्तदान शिबीर
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai