बिल मंजूरीसाठी मागितली लाच
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 20, 2023
- 569
नवी मुंबई : महावितरणच्या बिल प्रिंटींग व बिल वितरणाच्या कामाच्या बिलावर समाधानकारक असा शेरा मारून सदर बिल मंजुरीसाठी पुढे पाठविण्यासाठी कंत्राटदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या व तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या वाशी उपविभाग कार्यालयातील अतिरीक्त कार्यकारी अभियंता रविंद्र जाधव यांना ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ अटक केली.
या प्रकरणातील तक्रारदार गणेश शिंदे हे मनाली इंटरप्रायझेस कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. डिसेंबर 2022 मध्ये मनाली इंटरप्रायझेस कंपनीने 7 लाख 21 हजार रूपयाचे बिल वाशी येथील उप विभागीय कार्यालयात गत आठवड्यात सादर केले होते. त्यांनतर गणेश शिंदे बिलावर शेरा मारून मंजुरीसाठी पुढे पाठविण्याची विनंती केली. त्यावेळी रविंद्र जाधव यांनी बिलावर समाधानकारक शेरा मारून पुढे पाठविण्यासाठी शिंदे यांच्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अन्यथा बिल मंजुरीसाठी पुढे जाणार नसल्याचे सांगितलेे.
गणेश शिंदे यांनी ठाणे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली होती. तडजोडीअंती जाधव यांनी 15 हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. त्यानुसार ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने एमएसईडीसीएलच्या वाशी येथील उप विभागीय कार्यालयात सापळा लावून जाधव यांना शिंदे याच्याकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai