कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 02, 2023
- 587
नवी मुंबई ः कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजारपेक्षा जास्त मत पडली असून शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ 9 हजार 500 मतं पडली आहेत. हा महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील ( ) विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत होती. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल 20 हजार 648 मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना 9768 मते मिळाली आहेत. एकूण 3002 मते अवैद्य ठरली आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयी मताचा 16 हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.
हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा, 33 संघटनांचा आहे. गेल्या सहा वर्षात मी जे काम केलं. त्याची पोचपावती आज कोकण विभागातील शिक्षकांनी दिली आहे. तब्बल 33 संघटनाचा आम्हाला पाठिंबा होता. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझावर जो विश्वास टाकला, तो विश्वास आज सार्थकी लागला असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार व्यक्त करतो. विजयी उमेदवाराचे अभिनंदन करतो आणि कोकणच्या शिक्षकांनी दिलेल्या कौल मी खुल्या मनाने स्वीकार करतो. निकाल माझ्या दृष्टीने अनपेक्षित आहे. अश पद्धतीचं वातावरण नव्हतं पण निकाल आलाय तो मान्य करतो अशी प्रतिक्रिया शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी निकालानंतर दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai