विद्यार्थ्यांसाठी टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2023
- 648
नवी मुंबई ः शहर स्वच्छतेमध्ये सर्व घटकांचा सहभाग असावा यादृष्टीने एक अभिनव उपक्रम नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत आहे. वेस्ट टू बेस्ट प्रोजेक्ट या उपक्रमातून टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारली जात आहे.
वेस्ट टू बेस्ट प्रोजेक्ट नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते 9 वी च्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत असून टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना साकारणार आहेत. ‘वेस्ट टू बेस्ट प्रोजेक्ट' असे या स्पर्धात्मक उपक्रमाचे शिर्षक असून दि.23 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी आपापल्या नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून सादर करावायाच्या आहेत. या स्पर्धेमध्ये प्रत्येक महानगरपालिका शाळेतून इयत्ता पहिली ते पाचवी चा प्राथमिक गट, इयत्ता सहावी ते आठवी चा उच्च प्राथमिक गट आणि इयत्ता नववी चा माध्यमिक गट अशा 3 गटांतून प्रत्येकी 3 अशाप्रकारे एकूण 9 सर्वोत्तम प्रकल्पांची निवड केली जाणार आहे.
प्रत्येक शाळांतून निवडलेले हे 9 प्रकल्प अंतिम फेरीसाठी 24 फेब्रुवारी रोजी महानगरपालिका मुख्यालय स्तरावर पाठविण्यात येणार असून त्याठिकाणी त्यांचे मूल्यमापन होऊन अंतिम विजेत्या प्रकल्पांची निवड केली जाणार आहे. या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करताना प्लास्टिक कचरा, टाकाऊ लाकूड, काच, पेपर अथवा कार्डबोर्ड, ई वेस्ट अशा विविध स्वरुपातील कचरा म्हणून टाकून दिल्या जातील अशा साहित्याचा वापर करून कल्पकतेने आकर्षक वस्तू तयार करणे अपेक्षित आहे. या माध्यमातून मुलांमधील कल्पनाशक्तीला चालना मिळणार असून कचऱ्याचे मूल्य मुलांच्या मनावर नकळतपणे बिंबवले जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai