मिस नवी मुंबईसाठी सोळा सौंदर्यवती सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2023
- 656
नवी मुंबई ः यू अँड आय एंटरटेनमेंटद्वारे दरवर्षी मिस नवी मुंबई स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धेचे बारावे पर्व आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सोळा सौंदर्यवतंची निवड करण्यात आली आहे. मिस नवी मुंबई 2023 ची पत्रकार परिषद फोर पॉइंट्स वाशी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अंतिम फेरीत दाखल झालेल्या सोळा सौंदर्यवतींनी उपस्थितांची मने जिंकली.
यू अँड आय एंटरटेनमेंट ने बारा वर्षापूर्वी एक स्वप्न बघितले होते की जागतिक दर्जाची सौंदर्यस्पर्धा नवी मुंबईमध्ये आयोजित करावी. बारा वर्षाच्या या प्रवासातील अथक परिश्रमानंतर ही स्पर्धा सर्वोत्कृष्ट व सर्वात प्रतिष्ठित बनली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून फॅशन क्षेत्रात पदार्पण करणार्या सुमन राव, दिव्या अग्रवाल,अक्षता सोनवणे, कविता मिश्रा या सौंदर्यवतींनी देश व जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला आहे. अंतिम फेरीमध्ये दाखल झालेल्या सोळा सौंदर्यवतींमध्ये प्रणिता गावंडे, अश्विन कौर कोहली, शायना शिराझी, सलोनी गोल्लर, सोनाली चव्हाण, मेघा भोगले, नेहा भदौरिया, मिहिका नायक, साक्षी विसावे, शशी भदौरिया, रिया राज, श्रध्दा कटकधोंड, नेहा वर्मा, रवितनया शर्मा, दिया राचलवार, श्रुती काजळे हिचा समावेश आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार 4 मार्च 2023 रोजी वाशीच्या फॉर फोईन्ट्स मध्ये संपन्न होईल. आंतरराष्ट्रीयस्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणे व जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकणे सोपे नाही. प्रथम फेरीत शेकडो सहभागी स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट सोळा सौंदर्यवतीं निवडणे खूप कठीण आहे. निवडलेल्या सौंदर्यवतींना यू अँड आय टिमच्या वतीने उत्तमरित्या प्रशिक्षित केले जाते, असे यू अँड आय एंटरटेनमेंटचे हरमीत सिंग यांनी सांगितले. नवी मुंबई च रूपांतर एका ग्लॅमर शहरात करण्याच्या उद्देशाने आम्ही सौंदर्यववतींच्या कलागुणांना वर्षानुवर्षे अशी संधी देऊ शकलो, असे एंटरटेनमेंट चे अध्यक्ष सुरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai