एआयएमआयएम मुंबई पालिकेसह इतर पालिका निवडणुका लढवणार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 27, 2023
- 454
नवी मुंबई : ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलिमिन अर्थात एआयएमआयएमच्या पाहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा एक टप्पा पार पडला. हे दोन दिवसीय अधिवेशन नवी मुंबईतील महापे येथे पार पडले. यावेळी एमआयएम पक्षाची ताकद वाढत असून मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका या लढवण्यात येणार असल्याचे वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. तसेच प्रचारासाठी आयटी सेल उभारणार असून प्रसंगी समविचारी पक्षांशी युती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एआयएमआयएम च्या पाहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा एक टप्पा पार पडला असून यात 16 राज्यांतील प्रतिनिधींचे मत जाणून घेण्यात आले व पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये राज्यात पक्ष अधिक संघटित करण्यावर भर देण्यात येणार आहे. एमआयएमची स्थापना झाल्यापासून राष्ट्रीय अधिवेशन पार पडले नव्हते. पक्षाचा सर्व राज्यांमध्ये विस्तार झाल्याने राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. या अधिवेशनात पक्षाचे सर्व खासदार, आमदार, प्रवक्ते, प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले आहेत. एमआयएमला विविध राज्यांमध्ये पाठिंबा मिळत आहे. आगामी लोकसभा तसेच विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची वाढ करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतील, असे जलील यांनी यावेळी सांगितले. तसेच एमआयएम आयटी सेल उभारणार असून यासाठी मेहनत घेतली जाणार आहे. याद्वारे पक्षाचा प्रचार करण्यात येईल.
महाराष्ट्र औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जलील यांनी सांगितले. येथे हुकूमशाहीसारखे वातावरण सुरू असल्याची टीका खासदार जलील यांनी केली.राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचा अजेंडा ठरविण्यासाठी देशातील पाच लोकांची सदस्यीय समिती तयार करण्यात येणार आहे. देशातील कोणते पक्ष एमआयएमबरोबर येतील याची चाचपणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्या पक्षाबरोबर आघाडी युती करायची हे संबंधित राज्यांतील नेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या नंतरचे राष्ट्रीय अधिवेशन हैदराबादमध्ये होणार असल्याचेही जलील यांनी स्पष्ट केले. मुस्लीम समाजाला साद घालण्याचे काम भाजपा करीत असली तरी या देशात धार्मीक तेढ वाढवून जातीय सलोखा खराब करणाऱ्या भाजपाबरोबर मुस्लीम जनता जाणार नाही, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता एमआयएमचीही एण्ट्री होणार आहे. एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा शनिवारी त्यांनी या कार्यक्रमात केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai