मार्च अखेरी हापूसची आवक वाढणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2023
- 439
नवी मुंबई ः बदलत्या हवामानाचा कोकणातील हापूस आंब्यावर परिणाम होत असल्याने बागायतदारांनी हापूस आंब्याची चांगली निगा राखून परिपक्व हापूस आंबा बाजारात पाठविण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्यामुळे राज्यातील साडेसात हजार पेट्या हापूस आंब्याची आवक तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ बाजारात सुरु झाली आहे. मात्र मार्च अखेरीस हापूस आंब्याची घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.
देशात सुरू असलेल्या हवामान बदलाचा परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनावर झाला आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन आणि पहाटेपर्यंत कडाक्याची थंडी अशा वातावरणात हापूस आंब्यावर तापी परिणाम झाल्याने अनेक हापूस आंबा बागायतदारांनी आंबा काढून फेब्रुवारीमध्ये मुंबई पुणे बाजारात पाठविले आहे. या वातावरण संकटानंतर आता नवीन तंत्रज्ञान आणि पुन्हा फळ धारणा प्रक्रिया होणार नाही याची काळजी घेऊन बागायतदार हापूस आंब्याचे संरक्षण करीत आहेत. या संरक्षणामुळे अडीचशे ते पावणे तीनशे ग्रॅम हापूस आंबे मुंबईच्या बाजारात पाठविले जात आहेत यामध्ये देवगडचा हापूस आंबा आघाडीवर असून पाच डझनच्या हापूस आंब्याच्या पेटीला सध्या 3 हजार ते 7 हजार रुपये इतका दर दिला जात आहे हापूस आंब्याची ही आवक होळी नंतर मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी तसेच बागायतदार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे 15 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान हापूस आंबा खवय्यांना चांगल्या प्रतीचा मुबलक हापूस आंबा खाण्यास मिळणे शक्य होणार आहे. सर्वसाधारणपणे हापूस आंब्याची होणारी मोठी आवक ही एप्रिल मे ते जून दरम्यान होत असल्याचे दिसून आले आहे. परंतु यंदा हापूस आंब्याची राज्यातली तसेच पर राज्यातील आवक ही मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai