माथाडींचे प्रश्न पंधरा दिवसांत सोडवणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2023
- 532
कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्न येत्या 10 ते 15 दिवसात सोडवण्याचे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मंत्रालयात झालेल्या सर्व संबंधितांच्या बैठकित दिले. परंतु वारंवार केवळ आश्वासनावर बोळवळ होत असून प्रश्नांची सोडवणुक होत नसल्याने माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी संघटना व तमाम माथाडी कामगारांच्यावतीने नाराजी व्यक्त केली आहे.
माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सह्याद्री अतिथी गृह, येथे 21 सप्टेंबर, 2022 रोजी संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकित एक महिन्याच्या आंत प्रश्नांची सोडवणुक करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रश्नांची अद्याप सोडवणुक झालेली नाही. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन, महसूल, नगरविकास व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप पुकारला होता, त्यासंदर्भात राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दि. 27 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.
माथाडींचे अनेक प्रश्न शासनाच्या विविध विभागाकडे प्रलंबित आहेत, कामगार मंत्री यांच्यासमोर झालेल्या बैठकित सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत सखोल चर्चा झालेली आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून तेच प्रश्न, तेच अधिकारी, तीच आश्वासने शासन देत आलेले आहे, त्यामुळे आतां दिलेल्या आश्वासनाप्रमाणे माथाडी कामगारांच्या न्याय्य प्रश्नांची सोडवणुक न झाल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच माथाडी कामगारांना तीव्र आंदोलन करणे भाग पडेल, त्यापासून होणाऱ्या परिणास शासन व संबंधित जबाबदार रहातील, असा ईशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai