संदीप देशपांडेंना अज्ञातांकडून चोप
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 03, 2023
- 853
मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात हा हल्ला ठाकरे, वरुण यांच्याकडून करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्क मैदानाच्या गेट क्रमांक 5 जवळ एकाने संदीप देशपांडे यांच्यांवर हल्ला करण्यात आला. तीन-चार तरुणांनी स्टंप आणि बॅटने मारहाण केली. संदीप देशपांडे यांनी स्वतः पोलिसांत तक्रार दिली आहे. आपल्या जबाबात त्यांनी हल्ल्याचा सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे. तसेच हल्लेखोरांनी ठाकरे आणि वरुण अशी दोन नावं घेतल्याचंही देशपांडे यांनी जबाबात सांगितलं. पण हे ठाकरे आणि वरुण नेमके कोण हे स्पष्ट झालेलं नाही. त्यांनी पुढे म्हटले की, हल्लेखोरांकडून शिवीगाळ करण्यात आली. ठाकरेंना नडतोस? वरूणला नडतोस? पत्र लिहितोस, असं हल्लेखोरांनी मला म्हटले. या मारहाणीतून वाचवण्यासाठी काही नागरीक येत असताना त्यांनाही धमकावण्यात आले. त्यानंतर हल्लेखोर राजा बडे चौकाच्या दिशेने पळून गेले असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले. हल्लोखोर निघून गेल्यानंतर मित्रांनी उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात तातडीने दाखल केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai