तेजाकडून तेजाकडेच्या माध्यमातून युवा संवाद
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2023
- 447
नवी मुंबई : नवी मुंबईतील महाविद्यालयीन युवकांकरिता स्वामी विवेकानंदांच्या विचारावर आधारित तेजाकडून तेजाकडे अर्थात युवकांचे स्वामी विवेकानंद हा सुप्रसिध्द साहित्यिक, कवि व वक्ते प्रा. प्रवीण दवणे यांनी संकल्पीत केलेल्या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे शुक्रवार 10 मार्च रोजी वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.
झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रयुगात आज चोहो दिशांनी माहितीचा भडीमार होत आहे. अशा परिस्थितीत ताण-तणावात भरडल्या गेलेल्या तरुण पिढीला वात्सल्यपुर्ण विश्वास देण्याची आवश्यकता भासत आहे. या तरुण पिढीसमोर सकारात्मक विचारांचा आदर्श असणे हे त्यांच्या पुढच्या सशक्त वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यादृष्टीने आपल्या देशातील महान तत्वज्ञ, विचारवंत, जगद्विख्यात कुशल वक्ते स्वामी विवेकानंद यांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे करण्यात येत आहे. स्वामी विवेकानंदांच्या तेजोमय विचारांचा प्रकाश घेऊन जाण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन नवी मुंबई प्रेस क्लबद्वारे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai