रांजणपाडा ऐवजी रेल्वे स्थानकाला धुतूम नाव द्या
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 23, 2023
- 533
नामकरणासाठी धुतुम ग्रामस्थांचा मोर्चा
उरण : खारकोपर ते उरण रेल्वे मार्गवरील रेल्वेने दिलेल्या रांजणपाडा स्थानकाला धुतुम नाव द्या या मागणीसाठी गुरुवारी धुतुम ग्रामस्थांनी स्थानकात मोर्चा काढला. रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून खारकोपर ते उरण रेल्वेचे काम सुरू आहे. मात्र येथील स्थानिक व महसूल गावाच्या हद्दीऐवजी इतर गावांची नावे देण्यात आली आहेत. त्याला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून स्थानकांची नावे बदलण्यासाठी बोकडवीरा, कोट, नवघर आदी ग्रामस्थांचीही आंदोलने सुरु आहेत.
धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील मौजे शेमटीखार येथील रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव दुरुस्त करून धुतूम रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात यावे, तसेच सदर रेल्वे स्थानकात धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना उदरनिर्वाहासाठी सदर रेल्वे स्थानकात व्यवसाय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीने सिडको आणि रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या मोर्चात रेल्वे स्थानकाला धुतुम नाव मिळालेच पाहिजे, जमीन आमच्या हक्काची, ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो आदी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर धुतुम स्थानक नावाची प्रतिकृती ही आंदोलनकर्त्यांना स्थानकात लावली होती.
धूतूम सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धुतूम ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नियोजित रांजनपाडा रेल्वे स्टेशन येथे मोर्चा काढला होता. अनेक वर्षांपासून धुतुम ग्रामपंचायत तर्फे रेल्वे प्रशासन व सिडको प्रशासनाशी धुतुम रेल्वे असे नामकरण करावे यासाठी पत्रव्यवहार सुरु आहे. मात्र अजूनही रेल्वे स्टेशनला धुतुम हे नाव देण्यात आलेले नाही. जर रेल्वे स्टेशनला धुतुम हे नाव मिळाले नाही तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा प्रशासनाला दिलो.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai