दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्धाटनाला 6 एप्रिलनंतरचा मुहूर्त
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2023
- 733
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर उभारलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे उद्धाटन 6 एप्रिल नंतर होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी खासदार संजीव नाईक यांना दिली. संजीव नाईक यांनी दिल्ली येथे नुकतीच 16 मार्चला भेट घेऊन स्थानक प्रवाशांच्या सेवेत खुले करण्याची मागणी केली होती त्यावेळी दानवे यांनी हे आश्वासन दिले.
झपाट्याने विकसीत झालेल्या दिघा नोडमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. येथील नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी ऐरोली किंवा ठाणे स्थानक गाठावे लागते. हे दोन्ही अंतर जास्त असल्याने दिघा या नवीन स्थानकाची निर्मिती करण्याची मागणी संजीव नाईक यांनी केली होती. त्यानुसार सर्व कार्यवाही पुर्ण करुन दिघा रेल्वे स्थानकाच्या उभारणीस सुरुवात झाली. या स्थानकाचे सर्व काम पुर्ण झाली असल्याने प्रवाशांना त्याच्या उद्धाटनाची प्रतिक्षा लागील आहे. आमदार गणेश नाईक यांनी दिघा रेल्वे स्थानकाची 24 फेब्रुवारी 2023 रोजी रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक यांच्या समवेत पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता. नाईक यांनी यावेळी महत्त्वाच्या सूचना स्थानकाच्या कामासंदर्भात केल्या होत्या. या पाहणी दौऱ्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समवेत 3 मार्च 2023 रोजी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये दिघा स्थानकाचे उर्वरित काम तत्परतेने पूर्ण करण्याचा निर्णय झाला.
संजीव नाईक यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे नुकतीच 16 मार्चला भेट घेतली. दिघा स्थानकातील जवळजवळ सर्व अपूर्ण कामे पूर्ण झाली असून हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत खुले करण्याची मागणी केली. दानवे यांनी यासंदर्भात लगेचच वरिष्ठ रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून ते 6 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे हे अधिवेशन संपतात दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai