सुट्टीच्या हंगामात प्रवाशी बोट बंद
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2023
- 378
नवी मुंबईहून गेट वे ऑफ इंडिया आणि अलिबागला जाणाऱ्यांची गैरसोय
नवी मुंबई : नवी मुंबईहून समुद्रामार्गे मुंबईत आणि अलिबाग येथे जाता यावे यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून स्पीडबोट सेवा सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने ही सेवा सहा महिन्यापूर्वी सुरू केली होती. मात्र सध्या ही बोट बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एन उन्हाळी सुट्टीत ही सेवा बंद झाल्याने पर्यटकांचाही हिरमोड झाला आहे.
या बोटीच्या माध्यमातून अलिबाग येथील नागरिकांना मांडवा येथे जात येत होते. आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवार, ही बोट सेवा सुरू होती. या बोटीला लोकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. मात्र आता ही बोट बंद असल्याने अनेक नागरिकांना प्रवासासाठी इतर पर्यायांचा वापर करावा लागत आहे. ज्यामुळे त्यांना अधिक पैसे देखील खर्च करावे लागत आहे. अलिबाग आणि मांडावा येथे देश आणि महाराष्ट्रभरातून अनेक लोक पर्यटनासाठी येत असतात. यातच सध्या शाळकरी मुलांना उन्हाळ्याची सुट्टी आहे. पालकवर्ग मोठ्या प्रमाणात अलिबाग आणि मांडावा या ठिकाणी पर्यटनासाठी जात होते. मात्र सध्या ही बोट गेल्या आठवड्याभरापासून बंद असल्याने पर्यटकांचीही मोठी गैरसोय होत आहे. अजूनही महिनाभर ही बोट सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. या बोटीत काही तांत्रिक बिघाड आल्याने, ही बोट सेवा बंद ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, या ठिकाणाहून गेट वे ऑफ इंडिया येथे जाणारी बोट सेवा देखील बंद आहे. कारण याच्या एका फेरीला प्रवाशांना 300 रुपयांचं तिकीट काढावं लागत होतं. यातच नवी मुंबई येथील नागरिक 300 रुपये खर्च करून या सेवेचा लाभ घेत नसल्याने ही बोट देखील अनेकदा बंद ठेवण्यात येते. या बोटीच्या तिकिटाचे दर कमी करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. यासोबतच मांडावा येथे जाण्यासाठी जी बोट सेवा आहे, ती लवकरात लवकर सुरू करावी, जेणेकरून उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लोकांना घेता येथील, असं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai