आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 06, 2023
- 281
नवी मुंबई ः वाशीत भरवलेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेला देश विदेशातील स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात 500 हून अधिक योगसाधकांनी आपले योग कौशल्य दाखवले. विविध श्रेणीतील सुमारे 150 विजेत्यांना ट्रॉफी आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले.
लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स आणि आर्ट ऑफ लर्निंग इन्स्टिट्यूट, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एनएव्ही-राष्ट्र नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. रीना अग्रवाल, संचालिका आर्ट ऑफ लर्निंग इन्स्टिट्यूट आणि लायन्स क्लबचे डॉ. प्रताप मुदलियार यांचा पुढाकार होता.
ओमान, फ्रान्स, व्हिएतनाम, नेपाळ आणि थायलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनी त्यांच्या देशांचे प्रतिनिधित्व केले तर महाराष्ट्र, आसाम, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ आणि ओरिसा या राज्यांतील सहभागींनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 5 वर्षे ते 80 वर्षे वयोगटातील सहभागींनी अवघड आसने केली तर गटांनी सर्वात आव्हानात्मक तालबद्ध योगासन केले. तज्ञांसाठी, आयोजकांनी एक विशेष विभाग, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स तयार केला, जिथे 15 हून अधिक विजेत्यांना सुंदर ट्रॉफी आणि पदके देण्यात आली. विविध श्रेणीतील सुमारे 150 विजेत्यांना ट्रॉफी आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai