सिडको सोडतधारकांसाठी राज ठाकरेंची मुख्यमंत्री भेट
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2023
- 241
विविध प्रश्नांवर केली सकारात्मक चर्चा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी नवी मुंबईतील सिडकोच्या घरांचे वाढीव दर कमी करुन अथवा सोडतधारकांना इतर ठिकाणी सिडकोची शिल्लक घरे 20-22 लाखांपर्यंत देता येतील का अशा पर्यायांवर चर्चा झाली. त्यामुळे सिडको सोडत लाभार्थ्यांचा हा प्रश्न कसा मार्गी लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान आवास योजनेतील 7849 घरांची लॉटरी काढताना सिडकोने अत्यल्प उत्पन्न गटातील सोडत धारकांना उलवे नोड येथे 35 लाखांच्या किमतीत घरांचे दर ठेवल्याने हे दर कमी करावेत, म्हणून सिडको सोडतधारक महिना भरापासून लढा देत आहेत. या पार्श्वभुमीवर मनसेने 12 एप्रिलला सिडको विरोधात “भीक मागा” आंदोलन केले. त्यानंतर राज ठाकरे नवी मुंबईत आले असता लाभार्थ्यांनी त्यांची भेट घेवून आपले प्रश्न मांडले व घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली. त्यावर सकारात्मक चर्चा करुन या ोविषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलून हा विषय मार्गी लावून लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सिडको सोडतधारकांचे शिष्टमंडळही उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी शिंदे यांना पत्र देवून सिडको सोडत धारकांच्या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची विनंती केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून त्या योजनेतील सिडकोच्या घरांचे वाढीव दर कमी करुन अथवा सोडतधारकांना इतर ठिकाणी सिडकोची शिल्लक घरे 20-22 लाखांपर्यंत देता येतील का अशा पर्यायांवर चर्चा झाली. लवकरच याविषयी सिडको व्यवस्थापकीय संचालकांबरोबर मनसेची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai