ठाकरेंच्या सेनेला सर्वोच्च दिलासा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 28, 2023
- 541
ठाकरे सेनेची संपत्ती शिंदे गटाला देण्याबाबतची याचिका फेटाळली
मुंबई ः काही दिवसांपूर्वी शिवसेनेची (ठाकरे गट) संपत्ती एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच, याचिकाकर्त्यांला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. ‘याचिका दाखल करणारे तुम्ही कोण?' असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.
‘शिवसेना' नाव आणि ‘धनुष्यबाण' चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यनेते बनले होते. त्यामुळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात यावा, अशी याचिका वकील आशिष गिरी यांनी 10 एप्रिल 2023 ला सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर 28 एप्रिल रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आशिष गिरी यांना खडसावलं आहे. “ही याचिका दाखल करणारे तुम्ही कोण?”, असा प्रश्न उपस्थित करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिका फेटाळली आहे.
याचिका दाखल केल्यावर आशिष गिरी यांनी सांगितलं होतं की, “सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना पक्षाचं अध्यक्ष म्हणून कायम ठेवलं, तर शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा.” ‘मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. मी कायद्याच्या बाजूने आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर सर्व त्यांना देण्यात यावे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, तर त्यांना दिले जावे. मात्र, आता सर्व गोष्टींवर निर्बंध लागण्यात यावे,” असे गिरी म्हणाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai