काँग्रेस कार्यकर्त्यांचा नवी मुंबईत जल्लोष
- by Aajchi Navi Mumbai
- May 16, 2023
- 300
नवी मुंबई : 2023 कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने कौल दिल्याने देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नवी मुंबई काँग्रेसनेही हा विजय साजरा केला. स्पष्ट बहुमत मिळाल्याने नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत, प्रदेश प्रवक्ता नासिर हुसेन यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात ढोल ताशे वाजवत गुलाल उधळून जल्लोश साजरा केला. राहुल गांधी, सोनिया गांधी यांचा जयघोष करीत घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी ‘हा विजय केवळ काँग्रेसचा नसून तमाम कर्नाटकी जनतेचा, लोकशाहीचा आहे.' अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai