वैद्यकीय आणीबाणीसाठी 25 ठिकाणी फ्लॅश मॉब
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 15, 2023
- 446
नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स संपूर्ण नवी मुंबईतील अनेक ठिकाणी फ्लॅश मॉबद्वारे वैद्यकीय आणीबाणीचा सामना करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत जागरुकता वाढवत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून अपोलोने नवी मुंबईत 25 वर्दळीच्या ठिकाणी फ्लॅश मॉबद्वारे लोकांना जागरूक केले.
बेलापूर पोलीस स्टेशन, घणसोली बस डेपो, ग्रँड सेंट्रल मॉल-सिवूड, डी-मार्ट कोपरखैरणे, नेरुळ आणि वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी 15-20 मिनिटांचा फ्लॅश मॉब घेण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन देताना संतोष मराठे, प्रादेशिक सीईओ, पश्चिम विभाग, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले, पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी आपत्कालीन काळजी घेणे आवश्यक आहे. या संकल्पनेवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गोल्डन अवर, ज्यामध्ये संबंधित वैद्यकीय मदत विंडो कालावधीत मिळणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांना मूलभूत लाइफ सपोर्ट ट्रेनिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आपत्कालीन परिस्थिती विषयी अज्ञान टाळणे महत्त्वाचे आहे. नवी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी हे उपक्रम एखाद्याला आपत्कालीन काळजीबद्दल आवश्यक ज्ञान मिळवण्यास मदत करतात. तात्काळ वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका मिळण्यासाठी नवी मुंबईत फक्त 1066 डायल करणे आवश्यक आहे, संपूर्ण नवी मुंबईत रुग्णवाहिका मोफत वाहतूक प्रदान करते. अपोलोकडे सर्व वैद्यकीय गरजांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षित डॉक्टरांसह 247 उपलब्ध आपत्कालीन टीम आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai