4 फुटांवरील मूर्तींसाठी पीओपी वापरता येणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 07, 2023
- 241
पीओपीला पर्याय सुचवण्याबद्दलच्या गाईडलईन नसल्यामुळं सूट
मुंबई : पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे 4 फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. त्यामुळे गणेशमंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र चार फुटांपेक्षा कमी उंच मुर्तींसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस'ला पर्याय सुचवण्याबाबत गाईडलाइन अद्याप जाहीर झाली नसल्याने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वर्षी चार फुटांवरील गणेशमूर्ती ‘पीओपी'ची वापरता येणार आहे. पण, 4 फुटांखाली मूर्ती मात्र शाडूच्याच मातीची असणं बंधनकारक असणार आहे.
पोओपीच्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. त्यामुळे उंच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून मंडळांकडून सरकारकडे ‘पीओपी'ला पर्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, जरी मार्गदर्शक सूचना जारी केल्या, तरी या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं आणि सरसकट करता येणार नसल्याचं मूर्तिकारांचं म्हणणं आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai