महिलेच्या हत्येप्रकरणी तिघे गजाआड
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 13, 2023
- 430
उरण : पिरकोन-सारडे रस्त्यावर महिलेच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना उरण पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी हा मृत महिलेचा जावई असून तो सराईत गुन्हेगार आहे. महाराष्ट्राबाहेर पळून जात असताना या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
उरण तालुक्यातील पिरकोन-सारडे रस्त्यालगत सोमवारी (ता. 10) एका महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे 15 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तपासानंतर त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मृत महिलेची ओळख पटली असून मृत महिला ही आरोपीच्या दुसऱ्या पत्नीची आई आहे; मात्र पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळतात का यासाठी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असल्याचे उरण पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai