गणेशोत्सवापुर्वी एक मार्गिका खुली करण्यात येईल
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 14, 2023
- 356
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र नाईक यांचा विश्वास
नवी मुंबई ः मुंबई गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सूरु असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पावसाळी दौरा काढून महामार्गावरील खड्यांची समस्या जाणून घेतली. यावेळी त्यांनी गणेशोत्सवापुर्वी या मार्गावरील एक मार्गिका (सिंगल लेन) सुरु होईल अशा विश्वास व्यक्त केला.
गणेश भक्तांना गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील एक मार्गिका तरी चांगल्या पद्धतीची होण्यासाठी हा दौरा आयोजित केला होता. शुक्रवारी सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी मंत्री चव्हाण पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात आले. यावेळी पनवेलचे भाजपचे आ. प्रशांत ठाकूर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कासू येथील रस्त्याची पाहणी केली आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला. मंत्री चव्हाण यांच्या दौऱ्याची सुरुवात पळस्पे फाटा येथील साचलेल्या पाण्यातून वाट काढत झाली. यावेळी कासूपासून उरलेल्या 42 किमीच्या टप्प्यासाठी अधिक मशीनरीजचा वापर करून रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने या सिंगल लेनचे काम पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांसाठी ही सिंगल लेन खुली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कोकणात जाणारे रस्ते आणखी सुदृढ आणि सुरक्षित करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या 42 पैकी 12 किलोमीटर महामार्गाचे एका मार्गिकेचे काम झाले आहे. पावसाळा असल्याने अडचणी आहेत. तरी अधिकारी व ठेकेदार हे शेल्टर लावून महामार्गाचे काम करण्याच्या तयारीत असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai