भाजपने नितीन पाटील बिनविरोध
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 01, 2026
- 92
पनवेल ः पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज छाननीनंतर विविध कारणांमुळे तब्बल 57 उमेदवारी अर्ज बाद ठरले असून उर्वरित 343 अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग प्रभाग क्रमांक 18 अ मधून केवळ एकच उमेदवारी अर्ज वैध ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपचे उमेदवार नितिन जयराम पाटील यांना निवडणूक न लढताच यश मिळाले असून ते बिनविरोध निवडून आले आहेत.
पनवेल महापालिकेच्या 78 जागांसाठी एकूण 400 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. प्रभाग समिती 1 ते 5 मधील 345 अर्जांपैकी 293 अर्ज वैध ठरल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाले होते. यामध्ये प्रभाग समिती अ नावडे उपविभागातील 15 आणि प्रभाग समिती ब कळंबोली विभागातील 16 अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रभाग क्रमांक 18 मधील स्थितीबाबतची उत्सुकता गुरुवारपर्यंत कायम होती. 2 जानेवारी ही माघार घेण्याची मुदत असल्याने त्यानंतरच 20 प्रभागातील राजकीय सामन्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अखेर प्रभाग समिती ड पनवेल मधील 55 पैकी पाच अर्ज छाननीत बाद ठरल्याने 50 उमेदवार वैध ठरले. गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत यादीत प्रभाग क्रमांक 18 अ मधून केवळ एकच उमेदवारी अर्ज वैध ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपचे उमेदवार नितिन जयराम पाटील यांना निवडणूक न लढताच यश मिळाले असून ते बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे निवडणूकीपूर्वीच भाजपने पनवेलमध्ये खाते उघडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शेकापच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज जात वैधतेच्या कागदपत्रांतील त्रुटींमुळे बाद झाल्याची चर्चा पसरल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला होता. शेकाप महाविकास आघाडीला निवडणूकीपूर्वीच विधिसल्ल्यावर दुर्लक्ष केल्याचा पहिला झटका बसला. नितिन पाटील यांना निवडणूकपूर्वीच विजय मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पनवेलच्या राजकारणात ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai