बँकेच्या सेवा महागणार
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 05, 2018
- 568
मुंबई : एटीएममधून पैसे काढणं आता कमी होऊ शकतं. कारण आता एटीएममधून पैसे काढण्यावर तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत. बँकांनी फ्री सर्विस बंद करण्याचं ठरवलं आहे. आतापर्यंत महिन्याभरात एटीएममधून 3 वेळा फ्रीमध्ये पैसे काढता येत होते. पण आता त्यावर सर्विस चार्ज लागणार आहे. डइख, कऊऋउ, खउखउख, Aदखड आणि कोटक महिंद्रा बँक ग्राहकांकडून हे पैसे वसूल करु शकते.
बँकेकडून एटीएममधून पैसे काढणे, लॉकर विजिट आणि अनेक सेवा मोफत दिल्या जात होत्या. पण आता या सर्विस महागणार आहेत. बँकांनी सर्विस चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या सेवांसाठी बँकांना जवळपास 40 हजार कोटी रुपये मोजावे लागत होते. राजस्व विभाग आणि अर्थ खात्याला बँकांनी सूट देण्याची मागणी केली होती.
ग्राहकांना एटीएम ट्रांजेक्शन, फ्यूल सरचार्ज रिफंड, चेक बुक, डेबिट कार्ड सारख्या सेवा आता मोफत नाही मिळणार. टॅक्स डिपार्टमेंटने 40 हजार कोटींचा टॅक्स मागितला आहे. बँका आता हा टॅक्स ग्राहकांकडूनच वसूल करण्याच्या विचारात आहे.
राजस्व विभागाने बँकिंग सेवेवर सर्विस टॅक्स शिवाय त्यावरचं व्याज देखील जमा करण्यास सांगितलं आहे. हा सर्विस टॅक्स त्या गोष्टींवर लावला जातो जो ग्राहकांना बँकेकड़ून मोफत मिळतं.
कोणत्या सेवांवर लागणार चार्ज
एटीएममधून पैसे काढल्यास
चेकबुक सेवा
कॅश जमा करण्याची सेवा
लॉकर व्हिजिट सेवा
मिनिमम बँलेंस
जन धन योजना
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai