सारसोळेत पालिका सीबीएसई शाळा सुरु होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2023
- 344
नर्सरी ते पहिली प्रवेश प्रक्रिया सुरू
नवी मुंबई ः महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सारसोळे गावात नवीन सी.बी.एस.ई. बोर्डाची शाळा सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात सुरु करण्यात येणार आहे. तेथे नर्सरी, ज्युनिअर के.जी.,सिनअर के.जी. तसेच इयत्ता पहिलीच्या वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
प्रवेश पूर्णपणे नि:शुल्क असणार आहे. या प्रवेशामध्ये नर्सरीच्या प्रवेशासाठी 1 जुलै 2019 ते 31 डिसेबर 2020 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 3 वर्ष व कमाल वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे. तसेच ज्युनिअर के.जी. वर्गातील प्रवेशासाठी 1 जुलै 2018 ते 31 डिसेबर 2019 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 4 वर्ष व कमाल वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे. तसेच सिनिअर के.जी. वर्गातील प्रवेशासाठी 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 5 वर्ष व कमाल वय 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता 1 ली च्या वर्गातील प्रवेशासाठी 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 6 वर्ष व कमाल वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे. या चारही वर्गांकरिता प्रती वर्ग 30 विदयार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून प्रवेश घेण्यासाठी पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड व वडिलांचा रहिवासी पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
प्रवेशासाठीचे अर्ज सारसोळे शाळेमध्ये 25 जुलै 2023 रोजी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नि:शुल्क उपलब्ध आहेत. हे अर्ज पालकांनी पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह 26 जुलै 2023 रोजी पर्यंत शाळेत सादर करणे आवश्यक आहे. शाळेत प्रवेश देतांना शाळेपासून 1 कि.मी अंतराच्या आत राहणाऱ्या विदयार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज असल्यास लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai