केबीपीच्या अंशुमन झिंगरानचा जलतरणमध्ये विश्वविक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 24, 2023
- 312
35 किमी अंतर 11 तास 28 मिनिटांत पुर्ण
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या अंशुमन झिंगरानने वयाच्या 19 व्या वर्षी उत्तर आयर्लंड ते स्कॉटलंड ही 35 किमी अंतराची खाडी 11 तास 28 मिनिटे आणि 52 सेकंदात पूर्ण केली. त्याच्या या सुवर्ण कामगिरीमुळे एक नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित झाला. या विश्वविक्रमामुळे नॉर्थ चॅनेल क्रॉस करणारा जगातील सर्वात तरूण जलतरणपटू अशी इतिहासात त्याची नोंदही झाली.
1947 पासून ते आतापर्यंत 114 जलतरणपटूंनी ही खाडी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अंशुमन हा 114 वा जलतरणपटू आहे. तो सध्या बारावी वाणिज्य शाखेत शिकतो आहे. 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता त्याने खाडी पोहण्यास सुरूवात केली आणि संध्याकाळी 9.28 वाजता ती यशस्वीरित्या पूर्ण केली.13 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या वातावरणात त्याने केलेली ही सुवर्ण कामगिरी जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहे. या कामगिरीसाठी त्याला गोकुळ कामथ आणि ऋतुजा उद्देशी यांचे प्रशिक्षण लाभले. त्याचे दोन्ही प्रशिक्षक कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे माजी विद्यार्थी व शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आहेत.त्याच्या या विश्वविक्रमामुळे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी त्याच्या या अभिमानास्पद विश्वविक्रमाचे कौतुक आणि अभिनंदन केले. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख, सहसचिव डॉ. ज्ञानेश्वर मस्के जिमखाना चेअरमन प्रा. अर्जुन पोटिंदे जिमखाना प्रमुख प्रा. भास्कर हनवटे व आदींनी त्याचे अभिनंदन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai