मालमत्ताकर न भरणाऱ्या 158 लघु उद्योजकांच्या मालमत्ता सील
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 29, 2023
- 549
नवी मुंबई ; महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थकबाकीदारांच्या याचिकेवर आदेश पारीत करताना सर्वोच्च न्यायालयाने 2 ऑगस्ट 2023 रोजी सुनावणीची पुढील तारीख देत त्यापूर्वी सर्व थकबाकीदार लघु उदयोजकांनी मालमत्ता कर भरावा असे आदेश दिले होते. या आदेशास प्रतिसाद न देणाऱ्या 158 मालमत्ता कर थकबाकीदारांची मालमत्ता अटकावणी करण्यात आलेली आहे व उर्वरित अटकावणी प्रक्रिया जलद रितीने करण्यात येत आहे.
ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमधील मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. 302 थकबाकीदारांपैकी 158 जणांची मालीमत्ता सील केली आहे. उर्वरीत 144 जणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील लघुउद्योजकांनी अनेक वर्षांपासून मालमत्ताकर भरलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही उद्योजकांना कर भरण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 424 जणांनी 148 कोटी रूपये कर थकविला होता. त्यांना नोटीस दिल्यानंतर 122 जणांनी एकूण थकबाकीपैकी मुळ मालमत्ता कराची 36 कोटी रूपये जमा केली होती. उर्वरीत 302 जणांनी नोटीस देऊनही कर भरलेला नाही. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधीतांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मालमत्ताकर विभागाने 158 उद्योजकांच्या मालमत्ता सील केल्या आहेत. कारवाईनंतर 87 जणांनी दिड कोटीची थकबाकी भरली आहे. अजून 144 जणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.लघु उद्योजकांना कर भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानेही दिले आहेत. या आदेशाप्रमाणे सर्वांना नोटीस देण्यात आली आहे. सर्व उद्योजकांनी थकबाकी वेळेत भरावी अन्यथा नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल असा इशाराही मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख अतीरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिला आहे. मालमत्ता कर हा मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. या उत्पन्नामधूनच शहर विकासाची कामे करण्यात येत आहेत. एमआयडीसीमध्येही रस्ता, गटारे व इतर कामे केली जात असून उद्योजकांनी वेळेत कर भरावा असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai