यंदाही स्वरांश ठरला ‘मास्टरमांइड'
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 31, 2023
- 605
मास्टरमाइंड नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत मिळवले घवघवीत यश
नवी मुंबई ः पुणे येथे 30 जुलै रोजी पार पडलेल्या मास्टरमाइंड नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील स्वरांश कोळी याने यशस्वी कामगिरी केली आहे. त्याला 3 सन्मानचिन्ह, 3 पदके आणि विशेष प्रशस्तीपत्रक देवून सन्मानीत करण्यात आले आहे. या आधीही 2021 व 2022 मध्ये स्वरांशने ही स्पर्धा जिंकली होती. यंदाही त्याने या स्पर्धेत बाजी मारुन विजयाची हॅट्रिक केली आहे.
मास्टरमाइंड नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सलग तीसऱ्यांदा यश मिळवणारा स्वरांश कोळी हा बेलापुर येथे वास्तव्यास असून तेथीलच भारतीय विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थी आहे. लहानपणापासूनच स्वरांशने आपल्या बौद्धिक कौशल्याने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच त्याने स्पर्धां परिक्षांमध्येही चमकदार कामगिरी करुन नवी मुंबईचे नाव उंचावले आहे. अनेक पुरस्काराचा मानकरी ठरणाऱ्या स्वरांशने 2022-23 च्या मास्टरमाइंड नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेतही आपली चमक दाखवली आहे. स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवल्याने 2 सन्मान चिन्ह, 3 पदकं आणि विशेष प्रशस्तीपत्र देवून त्याचा 30 जुलै रोजी भारतीय विद्या भवन, पुणे येथे झालेल्या सत्कार समारंभामध्ये सन्मान करण्यात आला. स्वरांशच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai