एमआयडीसी विरोधात आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 05, 2023
- 425
63 वर्षे पुनर्वसन रखड्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक
नवी मुंबई ः ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा योग्य मोबदला आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, आदि मागण्यांसाठी पुन्हा एकदा एमआयडीसी-सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी एमआयडीसीच्या महापे येथील प्रादेशिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी केले.
गेली 63 वर्ष येथील प्रकल्पग्रस्त त्यांच्या पुनर्वसनापासून वंचित आहेत. जमीन संपादित करताना राज्य शासनाकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या 15 टक्के जमीन शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड, चाकण येथील एमआयडीसीसाठी जमीन संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना देण्यात येत आहे.
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहती प्रकल्पग्रस्तांना देखील शासनाच्या निर्णयानुसार 15 टक्के भूखंड वाटप, भूखंडाच्या किंमती रक्कमेवर आकारण्यात येणारे व्याज आकारणी रद्द करावी. सन-2009-10 मध्ये ज्या दराने भूखंड वाटप करण्यात आले त्या दराने भूखंड वाटप करावेत. वाटप करण्यात आलेल्या 100 चौरस मीटर भूखंडवर 1.5 चटई क्षेत्र द्यावे. ज्या जमिनीचा निवडा झालेला नाही तसेच मोबदला घेतला नाही; परतं, एमआयडीसीने वापरलेल्या किंवा कंपन्यांनी वर्षानुवर्ष वापर केलेला नाही, अशा जमिनी मुळ शेतकऱ्याला परत कराव्यात. शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यापूर्वी किंवा त्यानंतर उदरनिर्वाहाच्या दृष्टीने म्हशीचे गोठे, शेतघरे होती त्यांना पर्यायी भूखंड मिळावेत. तरुणांना रोजगार, तसेच साफसफाई आणि इतर लहान मोठी कंत्राटी कामे देण्यात यावी. तांत्रिक, माहिती-तंत्रज्ञान आणि इतर कोर्सेस (आयटीआय) प्रशिक्षण देऊन नोकरी द्यावी. महिला आणि अपंग यांना स्वयंरोजगार देण्याची तरतूद तसेच महिलांना पाळणा घरासाठी भूखंड द्यावे. एमआयडीसी क्षेत्रातील महापे, पावणे, टेटवली, अडवली-भूतवली आणि इतर गांवठाण विस्तार योजना लागू करावी, आदि मागण्यांसाठी महापे येथील एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आल्याचे कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai