नवी मुंबईतही पत्रकारांचे आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 17, 2023
- 361
नवी मुंबई ः पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुंबईतील पत्रकारांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्य सरकार विरोधात निर्देशने केली. याप्रसंगी पाचोरा येथील पत्रकारांवर झालेल्या हल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांना निवेदन देण्यात आले.
पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्य शिवीगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी त्याच्यावर हल्ला केल्यानंतरही संबंधित प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही. राज्यातही जिथे पत्रकारांवर हल्ले होतात तिथे त्याबाबतच्या संरक्षण कायद्याचे कलम लावण्यात पोलिस टाळाटाळ करत असल्याचे सांगण्यात आले. कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने गुरुवारी राज्यव्यापी आंदोलनाद्वारे त्याचा निषेध केला. पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अमंलबजावणी करण्यात होत असलेली कुचराई याच्या निषेधार्थ राज्यातील पत्रकारांच्या 11 प्रमुख संघटनांशी जोडले गेलल्या सर्व पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली. नवी मुंबईतील पत्रकारांनीही गुरुवारी वाशीत राज्य सरकार विरोधात निर्देशने केली. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अमंलबजावणी झालीच पाहिजे अशा घोषणा देत पाचोरा येथे पत्रकारांवर झालेल्या हल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांना निवेदन देण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai