कोकण भवनमध्ये खाजगी वाहनांना बंदी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 18, 2023
- 235
नवी मुंबई : सीबीडीतील कोकण भवन इमारतीत आता अभ्यंगतांच्या गाड्यांना 14 ऑगस्ट पासून प्रवेश बंद करण्यात आला आहे. शिवाय पार्किंगसाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली असून पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे.
मिनी मंत्रालय म्हणून कोंकण भवनची ओळख आहे. येथे सरकारच्या विविध विभागाचे 35 पेक्षा अधिक कार्यालय असून त्यात नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागाचेही कार्यालय आहे. या ठिकाणी अभ्यंगताचा राबता कायम असतो. त्यांच्या गाड्याही कोकण भवन कार्यालयातच पार्क केल्या जात. मात्र गाड्यांची वाढती संख्या पाहता जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे अनेकदा येथील कर्मचारी अधिकारी यांच्या गाड्या पार्किंगला जागा राहात नाही. त्यामुळे पार्किंग या समस्येने जास्तच उग्र रूप घेतल्याने अखेर अभ्यंगतांच्या वाहनांना प्रवेश बंदी आदेश काढण्यात आला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी 14 ऑगस्ट पासून करण्यात आली आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची वाहने असतील त्यांच्या गाड्यांवर स्टिकर्स चिटकवण्यास दिली जाणार आहेत. जेणेकरून सुरक्षा रक्षकाला बाहेरील गाडी ओळखता येईल.
दुसरीकडे कोकण भवनच्या आवारात अनेक सरकारी गाड्या अनेकवर्षांपासून शेडखाली धुळखात पडून आहेत. तसेच काही ठिकाणी राडारोडा पडला आहे. हे दोन्ही काढले तर 20 तरी गाड्यांची जागा होऊ शकते. कोकण भवन लगत एक मोठा भूखंड असून काही वर्षांपूर्वी कोकण भवन मध्ये येणारे अभ्यंगत त्याच भूखंडावर गाडी पार्क करीत होते. मात्र सध्या त्या ठिकाणी फेरीवाले बसत असल्याने पार्किंग करणे शक्य नाही. पार्किंग समस्या आहे हे खरे असले तरी अभ्यंगतांना प्रवेश बंदी हा त्यावरील उपाय नाही. इमारतीच्या मागील जागेचा, बाजुच्या भुखंडाचा मल्टिप्लेअर पार्किंग सुविधेसाठी विचार करायला हवा अशी मागणी अलर्ट सिटिझन फोरमचे सुधीर दाणी यांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai