सिडकोत 72 विद्यार्थ्यांचा गुणगौरव
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 02, 2023
- 277
नवी मुंबई ः सिडकोमध्ये 31 ऑगस्ट 2023 रोजी सिडको अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी सिडको महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम सन 1982 पासून प्रतिवर्षी आयोजित केला जातो.
या प्रसंगी अनिल डिग्गिकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राजेश पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक - 1, शांतनू गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक-2, सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, फैयाज खान, व्यवस्थापक (कार्मिक) व विनोद पाटील, अध्यक्ष, सिडको कर्मचारी संघटना यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेताना त्यातील यश-अपयश निश्चित नसते, परंतु तुम्ही घेत असलेल्या शिक्षणामुळे तुमचे व्यक्तिमत्व विकसित होण्यास निश्चितच मदत होते. शिक्षण क्षेत्रातील उपलब्ध विविध संधींचा लाभ घेऊन देशाच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे, असा संदेश अनिल डिग्गिकर यांनी दिला. या प्रसंगी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या 42 तर इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या 30 अशा एकूण 72 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai