आयुष्मान भव आरोग्य मेळाव्यात 3137 व्यक्तींची आरोग्य तपासणी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2023
- 346
नवी मुंबई ः भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते आयुष्मान भव मोहीमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ही मोहीम दि.17 सप्टेंबर ते दि. 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर मोहीमेअंतर्गत विविध आरोग्य उपक्रम राबविण्यात येत असून दर शनिवारी आयुष्मान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनेही आयुष्मान भव आरोग्य मेळावा आयोजित केला होता. यामध्ये सुमारे 3137 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
30 सप्टेंबर 2023 रोजी क्षयरोग, कुष्ठरोग व इतर संसर्गजन्य आजार याविषयी नमुंमपाची रुग्णालये व ना.प्रा.आ.केंद्र स्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यामध्ये सफाई मित्र, क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांच्या सहवासितांची, मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणी अंतर्गत एक्सरे तपासणी, रक्तदाब, ब्लड शुगर, रक्त तपासणी करण्यात आली. तसेच बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी शिबिर आयोजित करुन बांधकाम मजुरांची तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य मेळाव्यामध्ये सुमारे 3137 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरांवर आभा कार्डची निर्मिती व अवयव दानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
30 सप्टेंबर 2023 रोजीच्या आरोग्य मेळाव्यास नागरिकांचा मोठया प्रमाणावर उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शनिवार दि. 07 ऑक्टोबर 2023 रोजीच्या आरोग्य मेळाव्यामध्ये सर्व गरोदर मातांची तपासणी करण्यात येणार आहे. दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत दर शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मेळाव्यास नागरिकांनी असाच मोठया संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त रोजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai