Breaking News
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार की 11 डिसेंबरपासून याबाबतचा गोंधळ होता. मात्र, अखेर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली आहे. मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनास येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार होत होती. त्यानुसार आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 7 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. तसेच, 19 डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची अधिवेशनात बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विधिमंडळाच्या मुंबईत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूरचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अशी चर्चा सुरू झाली, की अधिवेशन 11 डिसेंबरपासून सुरू होईल. 11 डिसेंबरपासून अधिवेशन घेतले तर पहिला दिवस शोकप्रस्तावात जाईल. दुसऱ्या दिवशी आरक्षण आदी विषयांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्यक्ष अधिवेशन 13 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 20 डिसेंबरला अधिवेशन संपविले तर केवळ आठ दिवसांचे अधिवेशन होईल. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai