दिघा स्थानक सुरू करा नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 09, 2023
- 372
अधिवेशनात खा. राजन विचारे यांचा इशारा
नवी मुंबई ः तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक गेल्या सात ते आठ महिन्यापासून धुळखात पडलेले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये शासन व प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाल्याने स्थानिक खासदार राजन विचारे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनात संसदेत शून्य प्रहर वर चर्चा करून दिघा रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू असा थेट इशारा दिला आहे.
ठाणे व कल्याण या 2 लोकसभा मतदार संघाला जोडणारा ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या महत्वाकांक्षी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मिळत नसल्याने खडवले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व तेथे येणारा नोकरदार वर्ग रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पातील गांभीर्य खासदार राजन विचारे संसदेत बोलत असताना सांगितले की, ठाणे लोकसभा मतदार संघात येत असलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकात हार्बर रेल्वे मार्गातील प्रवासी जोडले असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात पडणारा अतिरिक्त भार कमी होवून 40 टक्के गर्दी कमी होणारा आहे तसेच कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत येथील नोकरीनिमित्त येणारा नोकरदार वर्ग थेट नवी मुंबई मध्ये येऊ शकतात असा हा प्रकल्प आहे. हे रेल्वे स्थानक सुरू न झाल्याने मध्य रेल्वेकडे मोठ्या प्रमाणात जमा होणारा महसूलही घटत आहे.
या प्रकल्पाचे भूमिपूजन 10 डिसेंबर 2016 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु प्रकल्पामध्ये एमएमआरडीएद्वारा 1080 झोपड्यांचे पुनर्वसनाअभावी प्रकल्प रद्द होऊ नये म्हणून सदर प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये करून पहिल्या टप्प्यातील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे काम 2018 मध्ये सुरू करून या स्थानकाचे काम मार्गी लावले आहे. हे दिघागाव रेल्वे स्थानक गेल्या 7 ते 8 महिन्यापासून तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान, रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री, मध्य रेल्वे मुख्य व्यवस्थापक, यांना वारंवार स्मरणपत्रे देऊन सुद्धा काही हालचाल झाली नाही. या स्थानकाच्या निर्मितीसाठी आत्तापर्यंत 90 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे. अखेर हा पैसा जनतेचाच असलेल्याने त्याचा फायदा जर जनतेला होत नसेल तर जनतेच्या हक्कासाठी व न्यायासाठी रस्त्यावर यावे लागेल यास आपण जबाबदार असाल असा थेट इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai