सिडकोत 69 कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 30, 2023
- 264
नवी मुंबई : सिडकोच्या आस्थापनेवर विविध विभागांत काम करणाऱ्या तृतीय श्रेणीतील 69 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी विभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पारदर्शक आणि गतिमान कारभाराचा एक भाग म्हणून या बदल्या केल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे. असे असले तरी या बदली प्रक्रियेत दुजाभाव केल्याचा आरोप करून प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिडकोच्या माध्यमातून हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. विशेषत: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, सागरी मार्ग आदींचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी घेतला आहे. त्यानुसार गतिमान आणि पारदर्शक कारभारासाठी एकाच विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या तृतीय श्रेणीतील 69 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या केलेल्यांत कार्यालयीन सहायक आणि लिपिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्याप्रमाणे शिफाई, सफाई कर्मचाऱ्यांच्यासुद्धा बदल्या केल्या आहेत. असे असले तरी अचानक केलेल्या या विभागांतर्गत बदल्यांमुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत. विशेषत: प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांवर यात अन्याय झाल्याची ओरड केली जात आहे, तर अनेक वर्षांपासून एकाच विभागात काम करीत असलेल्या काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांना यातून डावलल्याचा आरोप होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai