सराव परिक्षेसाठी 9900 विद्यार्थ्यांंची नोंदणी
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 06, 2024
- 418
6 जानेवारीपासून शुभारंभ
नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भीती दूर करून दहावीच्या मुख्य परीक्षेत त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढविणारी गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केली जाणारी एसएससी बोर्डाच्या धर्तीवर एसएससी सराव परीक्षेचा 6 जानेवारीपासून शुभारंभ होत आहे. यावर्षी या परीक्षेला 9900 विद्यार्थ्यांंनी नाव नोंदणी केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी खासदार संजीव नाईक आणि ट्रस्टचे सचिव तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सराव परीक्षा उपक्रमाचे यंदाचे 25 वे वर्ष आहे. 1998 साली ऐरोली येथे या सराव परीक्षेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी केवळ दोनच केंद्र होती. तसेच विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा 500 ते 600 इतकी होती. मात्र मागील 25 वर्षात या परीक्षेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा परिणाम म्हणून या वर्षी 9900 विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेसाठी नाव नोंदणी केल्याची माहिती संजीव नाईक यांनी दिली. 6 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. नवी मुंबईतील तब्बल 85 शाळांनी सहभाग घेतला आहे. नवी मुंबईतील सराव परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषा माध्यमातून घेतली जाते. सराव परीक्षेचे रौप्य महोत्सवी वर्ष एसएससी बोर्डप्रमाणे हॉलतिकीट, परीक्षा केंद्रे, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि त्या तपासणे अशी सर्व कामे तज्ज्ञ शिक्षकांमार्फत केली जातात. अशाप्रकारे व्यापक स्वरूपात सराव परीक्षेचा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असावा, असे संजीव नाईक यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एसएससी सराव परीक्षेमुळे नवी मुंबईच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारीदेखील वाढल्याचे शिक्षक सांगतात. बघता-बघता एसएससी सराव परीक्षा उपक्रमाने रौप्य महोत्सवी पंचविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. याचा आम्हाला विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन संदीप नाईक यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai