उरण-खारकोपर रेल्वेला हिरवा झेंडा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 13, 2024
- 437
उरण : अटल सागरी सेतूच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी उरण- खारकोपर या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. नेरुळ/बेलापुर-उरण प्रवास सुखकर होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सिडको, मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत 27 किमी लांबीचा आणि 1782 कोटी खर्चाच्या नेरूळ-उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील 27 किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील 11 स्थानकांपैकी नेरुळ, सीवूड, सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा 12.5 किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान 14.3 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आले. आता शुक्रवारपासून रेल्वे मार्ग प्रवासी वाहतूकीसाठी खुला झाला आहे.
उरणकरांना आता 15 रुपयांत 40 मिनिटांत बेलापूरला पोहचणे शक्य होणार आहे. तसेच उरणहून मुंबई-सीएसटीला दीड तासात सहज पोहचता येणार आहे. उरण-खारकोपर रेल्वे प्रवासी मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी उरण रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. खारकोपर आणि उरण दरम्यान आता लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढणार आहेत. यानंतर आता लोकल ट्रेनच्या 40 फेऱ्या या स्थानकांदरम्यान धावणार आहेत. आधीच नेरूळ आणि बेलापूरपासून खारकोपरपर्यंत दिवसाला 20 लोकल फेऱ्या सुरू आहेत. यातील काही लोकल उरण पर्यंत चालवण्यात येतील. तर काही नवीन लोकल फेऱ्या चालवल्या जातील.
- खारकोपर-उरण उपनगरीय मार्गाचे उद्घाटन(14.60 कि.मी.)
- (बेलापूर - सीवूड दरवे - उरण प्रकल्पाचा काही भाग)
- ठळक वैशिष्ट्ये: खर्च 1433 कोटी रुपये, लांबी 14.60 कि.मी., नवीन स्थानके 5, महत्त्वाचा पूल 1, प्रमुख पूल 2, छोटे पूल 39, रोड ओव्हर ब्रिज 3, रोड अंडर ब्रिज 3, पूर्ण होण्याची तारीख 13 मार्च 2023
- फायदे : मुंबई आणि नवी मुंबई भागातून जेएनपीटी बंदरापर्यंत वाहतूक सुलभ, खारकोपर ते उरण पर्यंत उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार केल्यास उरण परिसराची नवी मुंबई आणि मुंबईशी चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल, उपनगरीय रेल्वे सेवा सुरू केल्याने विद्यार्थी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा फायदा होईल. अलिबाग हॉलिडे डेस्टिनेशनला चांगली कनेक्टिव्हिटी मिळाल्याने या भागातील पर्यटनाला चालना मिळेल. वाहतुकीचे स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक साधन.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai