शेतकऱ्यांसाठी मोफत ध्यानसत्राचे आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 29, 2024
- 278
पनवेल : राज्यातील शेतकऱ्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून "माफदा" (महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्ट्रीसाईड सीड्स डीलक्स असोसिएशन) च्या सहकार्याने आर्ट ऑफ लिव्हिंगने घरबसल्या मोफत प्राणायाम व ध्यानसत्राचे आयोजन 26 ते 31 जानेवारी दरम्यान केले आहे. सकाळ, दुपारी आणि सायंकाळ अशा 3 सत्रात ऑनलाईन बॅच असणार आहेत.
शेतकऱ्यांना कोणत्याही एका बॅचमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यांना या माध्यमातून मानसिक आणि शारिरीक क्षमतेमध्ये वृद्धी करता येणार आहे. सहभाग घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नसून महिला, तरुण-तरुणी तसेच वृद्ध शेतकऱ्यांना सुद्धा यात सहभाग घेता येईल.
https://annadatasukhibhava.in/jayant_1miyv8 या ऑनलाईन लिंकवरून नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन आयोजक "माफदा" आणि "आर्ट ऑफ लिव्हिंग" यांच्यावतीने करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai