535 इमारती धोकादायक
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2024
- 439
30 वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण आवश्यक
नवी मुंबई ः महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतीचे सन 2024-25 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर एकूण 535 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 264 पोटकलम (1) (2) (3) (4) अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 265(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन 30 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महापालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण करून घेणे अनिवार्य आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजावयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावे. या प्रकारे संरचना परीक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था/मालक/भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना रूपये 25,000 अथवा सदर मिळकतीच्या वार्षिक मालमत्ता कराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठवावयाची तरतूद करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परीक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ुुु.पााल.र्सेीं.ळप संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण दिनांक 30 सप्टेंबर 2024 पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी किंवा सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करावयाचा आहे.
धोकादायक झालेल्या इमारतींचा / घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ शकते म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा / घराचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील याची नोंद घेण्यात यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai