नवी मुंबईचा निकाल 93.70 टक्के
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2024
- 487
नवी मुंबई : नवी मुंबई शहराचा एकूण निकाल 93.70 टक्के लागला आहे. पनवेल तालुक्यातून 10 हजार 558 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 10 हजार 328 विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे.
नवी मुंबईतून 15,737 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यामधील 86 विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. 15,649 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी 14,664 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.08 टक्के लागला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा 94.07 टक्के निकाल लागला आहे. तर मुलांचा निकाल 90.23 टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात एकूण 89 हजार 935 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामध्ये 44 हजार 280 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 45 हजार 655 मुले उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण 98 हजार 2 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 50 हजार 775 मुले आणि 47 हजार 227 मुलींचा समावेश होता. यापैकी 97 हजार 662 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात 50 हजार 593 मुले आणि 47,069 मुलींनी परीक्षा दिली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai