मतदार नोंदणीसाठी अंतिम मुदत
- by Aajchi Navi Mumbai
- May 28, 2024
- 420
नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 28 मे 2024 असून हे अर्ज पदनिदर्शत ठिकाणी ऑनलाईन व ऑफलाईन स्विकारले जातील.
भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर केलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नामनिर्देंशपत्रे शुक्रवार, 31 मे, 2024 स्विकारली जातील. ही नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी 7 जून, 2024 ही अंतिम मुदत राहील. 26 जून 2024 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. या निवडणूक कार्यक्रमासाठी 24 मे 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संबंधित मतदार यादीत नाव नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 28 मे 2024 पर्यंत हीींंीि://सींशेीश्रश्रीशसळीीींरींळेप.ारहरळीं.ेीस या संकेतस्थळावर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्विकारले जातील. जास्तीत जास्त पदवीधर नागरिकांनी विहित मुदतीत मतदार नोंदणी करावी असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai