लोकसहभागातून देशी वृक्षारोपण
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 10, 2024
- 336
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सर्वच विभागांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्राधान्याने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यासोबतच स्वच्छता मोहिमांचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमांमध्ये मोठया प्रमाणात नागरिक, त्यातही विशेषत्वाने महिला व विदयार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिकांचाही या मोहिमांमध्ये लक्षणीय सहभाग होता.
नवी मुंबई महानगरपालिका उदयान विभागाच्या वतीने नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर पडेल अशा कांचन, चिंच, मोहगना पारिजात, सिताफळ, जांभूळ, निंब, आंबा, बांबू या देशी वृक्षारोपांची लागवड करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उदयान विभागाने यावर्षी करावयाच्या वृक्षारोपणाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सदयस्थितीत वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या 35 हजारहून अधिक देशी वृक्षरोपांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार जागतिक पर्यावरण दिनी लोकसहभागातून आठही विभाग क्षेत्रात वृक्षारोपण मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळ वृक्षसंपदेने हरीत असावे या आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून येथे देशी वृक्षारोपण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड यांच्यासह उद्यान विभागाचे उपआयुक्त दिलीप नेरकर, परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त भरत धांडे, कार्यकारी अभियंता राजेश पवार तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सतीश पडवळ व उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम, ठाणे बेलापूर औद्योगिक संघटनेचे महाव्यवस्थापकमंगेश ब्रह्मे आणि इतर उपस्थितांच्या हस्ते याठिकाणी मोठ्या संख्येने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियानाची पर्यावरण संरक्षण संवर्धन शपथ ग्रहण केली.
- कांदळवन साफसफाई
बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील तलया येथील कांदळवन भागात नवी मुंबई महानगरपालिका व हेंकेल ग्रुप आणि महाविद्यालयीन एनएसएसचे विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभागातून विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सहभागी सर्व स्वयंसेवकांनी कांदळवन क्षेत्रातील साधारणत: 100 कि.ग्रॅ. प्लास्टिक व तत्सम कचरा गोळा केला. तसेच नेरूळ विभागातही सारसोळे जेट्टी येथे कांदळवन विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत एस के कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स नेरूळ व एस आय ई एस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नेरूळ यांच्या एनएसएस युनिटचे विद्यार्थी स्वयंसेवक व स्वच्छ्ता दूत यांनी परिसरातील प्लास्टिक व पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेले तत्सम साहित्य गोळा केले. - 150 बांबूची रोप लागवड
नेरूळ विभागात पोलीस स्टेशन समोरील जागेत लोकसहभागातून देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये विशेषत्वाने 150 बांबूची रोपे लावण्यात आली. ज्वेल ऑफ नवी मुंबई या आकर्षण केंद्रस्थळी एमजीएम विधी महाविदयालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक तसेच वृक्षप्रेमी विद्यार्थी यांच्या सहयोगाने वृक्षारोपण करण्यात आले. वाशी से.10 येथील स्व.मीनाताई ठाकरे उद्यान, मिनी सी शोअर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी मधील एनसीसीचे विद्यार्थी व एनएसएसचे विद्यार्थी तसेच वाशी विभागातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. तुर्भे विभागांतर्गत सानपाडा क्षेत्रातील सिताराम मास्तर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ सानपाडा तसेच बंड्स कॉलेजचे विद्यार्थी यांच्या एकत्रित सहयोगातून वृक्षारोपण करण्यात आले तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सानपाडा येथील संवेदना उद्यान याठिकाणीही नागरिकांच्या सहभागातून देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात सेक्टर 14 येथील निसर्गोद्यानात 200 हून अधिक आम्र वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. घणसोली विभाग कार्यक्षेत्रात सहा. आयुक्त संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली घणसोली सेक्टर 3 येथील सेंट्रल पार्क तसेच पाम बीच रोड से.1 लगत देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ऐरोली विभाग कार्यालय परिसरात कडूनिंबांची झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे ऐरोली, से-18 येथील रामदास बापु पाटील उदयानात ज्येष्ठ नागरिक संघटना, ब्रम्हकुमारी संस्था यांच्या सहयोगाने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. ऐरोली सेक्टर -14 येथील नमुंमपा शाळा मैदानात शालेय विदयार्थी तसेच सामाजिक पर्यावरणप्रेमी आणि सखी महिला यांच्या सहयोगाने कडुनिंबाची 50 वृक्षरोपे लावण्यात आली. पटनी रोड येथेही नेवा गार्डन सोसायटीपासून दिघ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला 100 नग कडूनिंबच्या झाडांचे मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या सहभागातून वृक्षरोपण करण्यात आले. दिघा विभागात तलावानजिकच्या साने गुरुजी उद्यानात देशी वृक्षरोपांचे रोपण करण्यात आले. वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम पार पडलेल्या सर्वच ठिकाणी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण रक्षण व संवर्धनाची शपथ ग्रहण करण्यात आली. 160 हून अधिक नागरिक व संस्थांनी 12 हजाराहून अधिक देशी वृक्षरोपे महानगरपालिकेकडून प्राप्त करुन घेतली आहेत. त्याचेही स्वतंत्र कार्यक्रम त्या त्या व्यक्ती / संस्थेमार्फत घेण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai