मिनी सी शोअर परिसरात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 11, 2024
- 408
नवी मुंबई ः स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांचे नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी वाशी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे तसेच स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे यांच्यासह प्रत्यक्ष सहभागी होत विद्यार्थी व स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सहयोगाने वाशी विभागात स्वच्छता मोहीम राबविली.
वाशीतील टिळक महाविद्यालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामधील एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्र येत महानगरपालिकेच्या वाशी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतामित्रांसह एकत्र येत जुहूगाव चौपाटी, वाशीतील मिनी सी शोअर, सेक्टर-10 परिसरातील प्लास्टिक कचरा जमा केला तसेच परिसराची स्वच्छता केली. 78 विद्यार्थी व नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचा-यांसह राबवलिलेल्या या स्वच्छता मोहीमेमध्ये 40 पोती प्लास्टिक कचरा तसेच 15 पोती काचेच्या बाटल्या जमा करण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा' अभियानातील पर्यावरण जपणूकीची शपथ तसेच ‘स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिक प्रतिबंधाची शपथ ग्रहण केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai